मराठा आरक्षण कायद्याला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात भक्कम पाठिंबा

बुधवार, 24 मार्च 2021 (20:27 IST)
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या  मुद्द्यावरील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. अंतिम सुनावणीनंतर निर्णय होणार असून, या मुद्द्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी राज्यातील ठाकरे सरकारला निशाणा साधला आहे. 
 
या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले आहे. "देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना गेल्या कित्येक वर्षांचा मराठा आरक्षणाचा तिढा सुटला. या मराठा आरक्षणाच्या कायद्याला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात भक्कम पाठिंबा दिला. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी सतत केंद्राच्या नावाने बोटे मोडणार्‍यांनी हे आवर्जून वाचले पाहिजे," असे म्हणत चंद्रकात पाटील यांनी राज्य सरकावर टीका केली आहे.
 
दुसऱ्या ट्विटमध्ये राज्य सरकारने कोणत्याच गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. "राज्य सरकारला असा कायदा करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि हा कायदा संवैधानिक आहे. हाही भक्कम युक्तिवाद केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला. कर्तव्यशून्य, अपयशी आणि कोणत्याच गोष्टीकडे गांभीर्याने न पाहणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या डोळ्यात हे झणझणीत अंजन आहे," असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती