उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली उपचार घेण्यास नकार दिला

मंगळवार, 11 जून 2024 (17:20 IST)
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसले आहे. आज बेमुदत उपोषणाचा चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटीलांची प्रकृती खालावली असून त्यांची वैद्यकीय पथकाने तपासणी केळी असता त्यांनी औषधे आणि उपचार घेण्यास नकार दिला. 

मनोज जरांगे पाटीलांची वैद्यकीय पथकाने तपासणी केळी असता त्यांना अशक्तपणा, कमी रक्तदाब, कमी वजन आणि इतर आजार असल्याचे आढळून आले. अशी माहिती त्यांच्या एका सहकाऱ्याने दिली. 
मनोज जरांगे यांनी कोणत्याही प्रकारचे औषध आणि उपचार घेण्यास नकार दिला. ते म्हणाले, जो पर्यंत राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत मागण्या मान्य करत नाही तो पर्यंत उपोषण सुरूच राहणार. 

मंगळवारी जरांगेची तपासणी करणाऱ्या सरकारी रुग्णालयातील एका डॉक्टरने सांगितले की, त्यांना  तातडीने उपचारांची गरज आहे, मात्र ते उपचार घेण्यास तयार नाही. या विषयावर बोलताना जरांगे म्हणाले, 'माझे उपोषण सुरूच राहणार आहे. काही लोक मराठ्यांची चळवळ कमकुवत करण्यासाठी बोलत आहेत , पण हे चालणार नाही. सरकारने प्रलंबित मागण्यांवर तातडीने तोडगा काढावा. 
 
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 4 दिवसांनी 8 जून रोजी जरांगे पाटील यांनी त्यांच्या मूळ गावी अंतरवली सरती येथे उपोषण करून नव्या चळवळीला सुरुवात केली. जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले पण जोपर्यंत सरकार मराठा आरक्षणाबाबत त्यांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
Edited by - Priya Dixit
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती