मराठा आरक्षणावर आज सुनावणी

बुधवार, 5 मे 2021 (07:13 IST)
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज  बुधवारी ६ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालय अंतिम निकाल देणार आहे. यामुळे आता मराठा आरक्षण टिकणार की नाही? हे  स्पष्ट होणार आहे. मराठा मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणाऱ्या महाराष्ट्र कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात येणार आहे. २७ मार्चला सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करताना अंतिम निकाल राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयात सकाळी १०.३० वाजता सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी करण्यात येणार आहे.
 
१०२ व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यांना आरक्षणाचे अधिकार आहेत की नाहीत, ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेबाबत इंद्रा साहनीसह आणि निकालाचे पुनर्विलोकन आवश्यक आहे की नाही, याबाबत युक्तिवाद करण्यात मागील सुनावणीवेळी करण्यात आला. यावर निर्णयासाठी सुप्रीम कोर्टाने निकालाची तारीख राखून ठेवली होती. बुधवार ६ मे रोजी होणाऱ्या सुनावणीमध्ये मराठा आरक्षण टिकाणार का? ५०% आरक्षण मर्यादा ओलांडता येईल का? गायकवाड अहवाल योग्य आहे का? तसेच इंदिरा सहानी प्रकरण लार्जर बेचकडे प्रकरण जाणार का? यावर सुनावणी करण्यात येणार आहे.
 
मराठा समाजाला एसईबीसीअंतर्गत शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण देण्यात आले होते. यासोबत सुप्रीम कोर्टाने पाच सदस्यीय घटनापीठाने १९९२ मधील इंद्रा सहानी प्रकरणातील निकालामध्ये आरक्षणावर ५० टक्क्यांची जी मर्यादा घालण्यात आली होती. त्याचा फेरविचार करावा की नाही याबाबतचा निकाल देखील राखून ठेवला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती