भारतातील पहिली घटना सोशल मिडीयाचा गैर वापर काही काळ पूर्ण जिल्हाभराचे इंटरनेट बंद

सोमवार, 10 ऑक्टोबर 2016 (14:06 IST)
सोशल मिडिया इतका घातक ठरू शकतो याचे उधाहरण सध्या नाशिक आहे. सोशल मिडिया वरील अफवेमुळे तळेगाव येथील आंदोलन हिंस्र झाले. त्यात जवळपास कोटींचे नुकसान झाले असून हजारो लोकांना याचा त्रास सहन करावा लागला आहे. तर येऊ घातलेला दसरा आणि मोहरम या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये या साठी प्रथमच देशात आणि महाराष्ट्रात मोबाईल आणि इतर इंटरनेट सेवा पोलिसांनी बंद करायला सांगितली असून ती बंद झाली आहे.
 
तळेगाव येथील आंदोलन सुरु असताना पोलिसांनी अनेकदा सागितले की सोशल मिडिया वापरू नका  परंतु कोणीही हे न ऐकता आक्षेपार्ह मजकुरासह आंदोलनाचे अनेक फोटो व्हिडियो ग्रुपवर टाकणे सुरुच होते. एकूणच परिस्थिती बघता संपर्काचे प्रभावी माध्यम समजल्या जाणारी इंटरनेटसेवा बंद ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी कुठल्याची प्रकारे अफवा पसरवू नयेत किंवा अफवा पसरवून शांतता भंग करू नये असे आवाहन पोलीस यंत्रणेकडून करण्यात आले आहे. तसेच, संपूर्ण जिल्ह्यातील इंटरनेट सेवा मोबाईल कंपन्यानी बंद ठेवून पोलिसांना सहकार्य केले आहे. त्यामुळे आता नाशिक मधील लाखो लोकांचे नेट कमीत कमी तीन दिवस बंद राहणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा