जातीवर आरक्षण असेल तर माझा विरोधच - राज ठाकरे

सोमवार, 3 ऑक्टोबर 2016 (10:44 IST)
जातीवर असेलल्या  आरक्षणाला माझा ठाम विरोध असून जातीवर आधारित आरक्षण रद्द करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. केवळ आर्थिक निकषांवर आधारित आरक्षणाला मान्यता द्यावी, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी ठाण्यातील  मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यातआहे .त्यामुळे  आता   मराठा आरक्षण यात राजयांनी उडी घेतली आहे.
 
आरक्षणाच्या माध्यमातून समाजात दरी निर्माण करायचा प्रयत्न सतत  केला जातोय आणि आपण पाहत सुद्धा आहोत.सर्वच पक्षांना फक्त आरक्षणाचं राजकारण करायचं आहे, जर आरक्षण  या विषयाला  कोणाचा  विरोध  नाही   तर मंग  कोणती  अडचण येतेय असेही ठाकरे  यांनी सागितले आहे. 
 
शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं, असं विधान केलं त्यांनी   पुन्हा केले अरे मग सत्ता  होती तेव्हा का दिले नाही, मग 15 वर्ष सत्तेत असताना काँग्रेस-राष्ट्रवादीने ते का नाही दिलं नाही, असा प्रश्नही राज यांनी विचारला.  मला जात माहित नाही समोर माणूस महत्वाचा की त्याची जात त्यामुळे मी फक्त माणसाला किमत देतो जातीला नाही असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. 
भाषणातील महत्वाचे मुद्दे 
- 15 वर्षात तुम्ही का नाही दिल आरक्षण; शरद पवारांना राज ठाकरेंचा सवाल
- आजपर्यंतचे राज्यकर्ते हे मराठा समाजाचे होते मग तेव्हा का नाही दिल आरक्षण
- आरक्षणाचे उद्योग हे राजकारण करण्यासाठी
- मी जात पात मानत नाही
- कोणाच्या जातीपातीचं मला देण घेण नाही
- अधिवेशन घेण्याआधी उद्धव ठाकरेंनी आरक्षणाबाबत प्रतिक्रिया द्यावी
- आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे 
- रामदास आठवले विनोद झालाय
- आरक्षणावर बढती नको
- आरक्षण फक्त दरी निर्माण करण्यासाठी
- मी निवडणुकांचा विचार करून पाऊल टाकत नाही तर महाराष्ट्रचा विचार करून पाऊल टाकतो

वेबदुनिया वर वाचा