मणिपूरचे मुख्यमंत्री सिंह यांनी AFSPA संदर्भात पुन्हा केले वक्तव्य

सोमवार, 24 जानेवारी 2022 (11:37 IST)
मणिपूर निवडणूक 2022: मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी म्हटले की  केंद्राच्या संमतीने सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) रद्द करायचा आहे. सिंग म्हणाले की आम्ही म्यानमारशी आंतरराष्ट्रीय सीमा सामायिक करणारा राज्य असून आम्हाला राष्ट्रीय हित जपावे लागेल.
 
सिंग म्हणाले की मणिपूरच्या लोकांना AFSPA रद्द करण्याची इच्छा आहे. केंद्र सरकारच्या परस्पर संमतीनंतर देशाची सुरक्षा आमच्यासाठी प्राधान्य असल्याचे ते म्हणाले.
 
त्यांनी विश्वास व्यक्त केला की केंद्राच्या संमतीने AFSPA हळूहळू काढता येऊ शकतो. परंतु म्यानमारमध्ये राजकीय स्थैर्य नसून आपला देश त्यासोबत सीमा सामायिक करतो हे लक्षता ठेवणे देखील गरजेचे आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती