शिर्डीच्या महाएक्स्पोत शेतकऱ्यांना दिली भूमीमातेची माहिती

बुधवार, 29 मार्च 2023 (23:46 IST)
अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिराचा शिर्डीत डंका
अमळनेर : देशातील अतिप्राचीन, अतिदुर्गम व अति जागृत असलेल्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरात विराजमान असलेल्या भूमी मातेची माहिती  शिर्डी येथे आयोजित महापशुधन मेळाव्यात शेतकऱ्यांना देण्यात आली.
शिर्डी येथे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचा तीन दिवसीय मेळावा संपन्न झाला. या प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री अब्दुल सत्तार होते. तर व्यासपीठावर पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, नागपूरचे कुलगुरू शरद गडाख, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांतकुमार पाटील, महानंदाचे चेअरमन राजेश परजणे, जि. प. सदस्या शालिनीताई विखे, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, अण्णासाहेब म्हस्के, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जि. आहे. प. सीईओ आशिष येरेकर, पशुसंवर्धनचे अतिरिक्त आयुक्त शीतलकुमार मुकणे, जिल्हा उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे आदी उपस्थित होते.
मंगळ ग्रह मंदिराचा सहभाग
रेती, माती व शेतीशी व्यवसायाशी संबध असलेल्या व्यक्तीचा भूमीमाता आराध्य दैवत आहे. या देवाचे अमळनेर येथे एकमेव मंदिर आहे. त्यामुळे बिल्डर्स, आर्किटेक्चर्स, सैन्य दलातील जवान यासह शेतकरी मोठ्या संख्येने अमळनेरच्या मंगळ ग्रह मंदिरात येऊन भूमीमातेचे दर्शन घेतात. शिर्डीत येथे देशभरातून आलेल्या शेतकरी बांधवांना भूमीमाता व मंगळ ग्रह देवतेची माहिती देण्यात आली. यावेळी मंदिराचे जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, सुबोध पाटील, सेवेकरी नितीन सोनवणे, राजू देवरे आदी उपस्थितीत होते.
३०० स्टॉल प्रदर्शनात
शिर्डीत आयोजित प्रदर्शनात ३०० स्टॉलची उभारण्यात आले होते. प्रदर्शनात विविध प्रजातीचे पशुधन, खाद्य पदार्थ, शेती उपयोगी साहित्य, खते, औषधे, घरगुती साहित्य, शुभेच्या वस्तू आदी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. यासोबतच अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिराची माहिती व्हावी, यासाठी मंदिर प्रशासनाने व्यवस्था केलेली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती