अमळनेरच्या बसस्थानकाच्या कायापालटास प्रारंभ

मंगळग्रह सेवा संस्थेने घेतले दत्तक 
Amalner Bus Stop अमळनेर येथील बसस्थानकाला मंगळग्रह सेवा संस्थेने दत्तक घेतले आहे. बसस्थानकाच्या एकूणच चेहरामोहरा तथा कायापालटाच्या उपक्रमाचे ७ जुलै रोजी नामदार अनिल पाटील यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून उदघाटन करण्यात आले. यावेळी जळगाव जिल्हा विभाग नियंत्रक भगवान जगनोर, विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, सेवानिवृत्त महाव्यवस्थापक माधव देवधर, आगार व्यवस्थापक इम्रान पठाण, कामगार नेते ए. टी. पाटील, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, आनंद महाले, निलेश महाजन, राहुल पाटील तसेच संस्थेचे कन्स्ट्रक्शन कन्सल्टंट संजय पाटील, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील आदी उपस्थित होते. 
 
मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे बसस्थानकाचे रंगरंगोटीकरण, सुशोभीकरण, अद्ययावतीकरण, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, छोटेखानी बगीचा तयार करणे,  प्रबोधनपर चित्रे व शिल्प निर्मिती, पिण्यासाठी २४ तास आर.ओ.चे पाणी, मातांना स्तनपानासाठी हिरकणी  कक्ष, ग्रंथालय, स्वच्छतागृहांचे नूतनीकरण आदी विविध सोयी-सुविधा व सौंदर्यीकरण संस्थेतर्फे केले जाणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती