मंगलदोषच्या अभिषेक, पूजा व दर्शनासाठी अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मंगळवारी अमळनेर येथील महिला भाविक सुवर्णा पाटील यांची नजरचुकीत पर्स मंदिर परिसरात हरविली. या पर्समध्ये बँकेचे एटीएम, घराच्या चॉबी, काही मौल्यवान दागिने व महत्वाचे कागदपत्रे होते. पर्स हरविल्याबाबत सुवर्णा पाटील यांच्या लक्षात येताच. त्या खूप घाबरल्या. सदर पर्स बेवारस पडल्याचे जळगाव येथील रामचंद्र पोतदार यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ मंगळ ग्रह मंदिराच्या चौकशी कक्षाशी संपर्क साधून सदर पर्स मंदिर प्रसासनाकडे सोपवली. पर्स हरविल्याबाबत आवाहन करण्यात आल्यानंतर सुवर्णा पाटील रामचंद्र पोतदार यांच्या हस्ते पर्स सोपविण्यात आली.