वर्ल्ड कप 1975चे मॅन ऑफ द मँच

गुरूवार, 22 जानेवारी 2015 (15:48 IST)
क्लाइव लॉयड (वेस्टइंडीज, नाबाद 102 धावा ) - 31 ऑगस्ट 1944ला जन्म घेणार्‍या क्लाइव लॉयड क्रिकेट समुदायात लीजेंड कॅप्टनम्हणून प्रसिद्ध आहे. पहिल्या वर्ल्डकपच्या फायनलमध्ये वेस्टइंडीजचे कर्णधार लॉयड यांना शानदार शतक (102 धावा) काढल्याबद्दल त्यांना भेट म्हणून 'मॅन ऑफ द मॅच' मिळाले होते.   
लॉयडच्या कप्तानीत वेस्टइंडीजने 1975मध्ये पहिला वर्ल्ड कप जिंकला आणि 1979मध्ये त्याला कायम ठेवला पण 1983च्या वर्ल्डकप फायनलमध्ये वेस्टइंडीज संघाचा भारताकडून पराभव झाला. लागोपाठ तीन वेळा वर्ल्ड कपमध्ये त्यांनी कप्तानी करण्याचा रेकॉर्ड बनवला, जो आजपर्यंत कायम आहे. हेच नव्हे तर या क्रिकेटरच्या नेतृत्वात वेस्ट इंडीजने लागोपाठ 27 टेस्ट जिंकले.  लॉयडने 110 टेस्ट मॅचमध्ये  7515 धावा (उच्चतम नाबाद 242) आणि 87 वनडे सामन्यात 1977 धावा (उच्चतम 102 धावा) काढल्या. 

वेबदुनिया वर वाचा