मकर संक्रांतीला या प्रकारे करावे सुगड पूजन

शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (09:08 IST)
मकर संक्रांत हा नव वर्षातील पहिला सण ज्याचा सर्वजण तिळगूळ वाटून, पतंग उडवून आनंदात घेतात. या दिवशी पूजेचं देखील महत्तव आहे. या दिवशी सुवासिनी सुगड पूजन करतात आणि एकमेकींना वाण देतात. चला तर जाणून घ्या सुगड पूजनाची योग्य पद्धत-
 
या दिवशी अंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यावे.
या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करून पूजा करू शकता.
पूजा मांडायची असेल तिथे चौरंगाच्या भोवती रांगोळी काढावी. 
रांगोळीच्या मधोमध स्वास्तिक काढून चौरंगाला हळद-कुंकू वाहून पूजा मांडावी.
नंतर सुगड म्हणजे छोट्या मातीच्या मडक्यांना हळदी-कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळावा.
सुगडांमध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे, शेंगा, कापूस, हरभरे, तिळगूळ, कच्ची खिचडी, इत्यादी भरावे.
असे पाच सुगड तयार करावे.
चौरंगावर लाल वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ अगर गहू ठेवावे. 
नंतर त्यावर भरलेले सुगड मांडावे.
पूजा मांडल्यानंतर बाजूला दिवा लावावा. 
सुगडावर हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा.
त्यातून एक सुगड देवासमोर आणि एक सुगड तुळशीपाशी ठेवावा.
तीळगुळ, हलवा याचा नैवेद्य दाखवावा.
नंतर किमान पाच सवाष्णींना वाण-वसा करावा.
या दिवशी हळदीकुंकू समारंभ करून तिळगूळ वाटावा.
प्रत्येकीला आवा म्हणून भेट वस्तू द्यावी.
मकरसंक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो. या दरम्यान हळदीकुंकू समारंभ, दान व तिळगूळ देऊ शकता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती