मकर संक्रांतीचा आवा, ज्योतिष दृष्टीने कोणती भेट वस्तू देणे योग्य जाणून घ्या

सोमवार, 11 जानेवारी 2021 (16:36 IST)
मकर संक्रांती सणानिमित्त कुमारिका आणि सवाष्ण स्त्रिया 14 वस्तू आवा म्हणून वाटप करतात. या वस्तू श्रृंगार किंवा दैनंदिन वापरण्यात येणार्‍या वस्तू असतात. हळद-कुंकु समारंभ करुन या भेटवस्तू दिल्या जातात. यासाठी ज्योतिष दृष्टीने कोणती भेटवस्तू देणे योग्य ठरेल जाणून घ्या-
 
मेष : बांगड्या
बांगड्या सौभाग्याचे प्रतीक असून बांगड्या आणि कंगण याचे अनेक प्रकार सहज उपलब्ध असतात. आपण 14-14 असे सेट तयार करुन आवा म्हणून देऊ शकता.
 
वृषभ : दिवा आणि वस्त्र
तांबा, पितळ, चांदी, स्टील, मातीचे दिवे देऊ शकता. किंवा वस्त्र म्हणून रुमाल, मास्क, स्कार्फ, शॉल, स्टोल, चुनरी, कुर्ते, मोजे, लैगिंग्स इतर पर्याय निवडू शकता.
 
मिथुन : भांडी
संक्रातीसाठी लहान -मोठे आकर्षक भांडी बाजारात उपलब्ध असतात. यात वाट्या, चमचे, प्लेट, ग्लास, पूजेची भांडी, कळश व इतर वस्तू देऊ शकता. आपण आपल्या इच्छेप्रमाणे स्टीलच नव्हे तर पितळ ‍किंव चांदीचे भांडी देऊ शकता.
 
कर्क : टिकली किंवा कुंकू
कपाळावर लावल्या जाणार्‍या टिकल्यांचे विविध डिजाइन आणि वैरायटी कोणालाही आकर्षित करेल. आपण आपल्या बजेटनुसार बिंदी किंवा स्टाइलिश ‍डबीत कुंकु आवा म्हणून देऊ शकता.
 
सिंह : लाल कुंकु
आपल्या राशीसाठी कुंकु शुभ आहे. सुंदरश्या डबीत किंवा करंड्यात हळदीसह कुंकु द्यावे.
 
कन्या : चांदीचे जोडवे
वेगवेगळ्या डिजाइनमध्ये जोडवे उपलब्ध असतात. आपल्या राशीसाठी हा आवा उत्तम ठरेल.
 
तूळ : मोती
आपल्या राशीसाठी मोती शुभ आहे. आपण मोतीचे टॉप्स, बांगड्या, अंगठी, किंवा इतर पर्याय निवडू शकता.
 
वृश्चिक : चुनरी
कॉटन, रेशम, सिल्क, जॉर्जेट, शिफॉन, बंधेज, लहरिया, चुनरी प्रिंट, नेट इतर विविध प्रकारात चुनरी उपलब्ध असतात. आपल्या बजेटमध्ये आकर्षक दुप्पटा किंवा स्टोल खूपच छान दिसेल.
 
धनु : सौभाग्याच्या वस्तू
मंगळसूत्र, जोडवी, टिकल्या, श्रृंगाराच्या वस्तू व इतर फॅशनमध्ये असलेल्या कोणत्याही सौभाग्याच्या वस्तू आपण आवा म्हणनू देऊ शकता.
 
मकर : स्टील
आपल्या राशीचा स्वामी शनी आहे आणि स्टील (लोखंड) शनीचं प्रतिनिधित्व करतं. या राशीसाठी दरवर्षी स्टील भेट वस्तू म्हणून देणे अती उत्तम ठरेल. स्टीलच्या अनेक लहान-मोठ्या वस्तू बाजारात सहज उपलब्ध असतात. 
 
कुंभ : सुवासिक वस्तू
आपल्यासाठी साबण, उदबत्ती, चंदन, गुलाबाचे फुल, परफ्यूम, क्रीम, पॉवडर, अत्तर या सारख्या वस्तू ज्याने सुवास दरवळतो, भेटवस्तू म्हणून देणं योग्य ठरेल. 
 
मीन : पैंजण
आपल्यासाठी पैंजण देणे शुभ ठरेल. चांदीच्या व्यतिरिक्त इतर धातूने तयार पैंजण देखील देऊ शकता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती