मकर संक्रातीला हे काम टाळा नाही तर वर्षभर झेलावं लागेल नुकसान

मंगळवार, 14 जानेवारी 2020 (16:20 IST)
उशिरा उठणे
या दिवशी उशीरापर्यंत झोपणे योग्य नाही. सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्ध्य देऊन मंदिरात जाऊन किंवा देवघरात पूजा करावी.
 
पूजा केल्याशिवाय अन्न ग्रहण
या दिवशी पूजा- पाठ करण्यापूर्वी काहीही सेवन करणे योग्य नाही.
 
पीक कापणी
संक्रांती निसर्गाशी जुळलेला सण आहे. या दिवशी पिकाची कापणी टाळा. या दिवशी कापणी अशुभ मानली गेली आहे.
 
केस धुणे
या दिवशी केस कापणे किंवा धुणे वर्जित मानले गेले आहे.
 
मांसाहार टाळा
या दिवशी शाकाहारी भोजन ग्रहण करावे.
 
वाद
हा दिवस नात्यातील कडवटपणा विसरून गोडवा निर्माण करण्याचा आहे. या दिवशी कोणताही वाद टाळा.
 
नशा
या दिवशी कोणत्याही प्रकाराचे व्यसन, नशा करणे योग्य नाही. तसेही कधीही नशा टाळणे आरोग्यासाठी योग्यच ठरेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती