घरातील सर्व लोकांनी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करावे.
या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे.
भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे.
या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे.
संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या सणाला देशभरात वेगवेगळी नावे आहेत. तामिळनाडूत हा सण “पोंगल” तर आसाममध्ये “भोगली बिहू” नावाने ओळखा जातो. पंजाबमध्ये “लोहडी “, तर राजस्थानमध्ये “उत्तरावन” म्हणून साजरा केला जातो.