महाशिवरात्री महाउपाय, निश्चितच ऐश्वर्य लाभेल

मंगळवार, 5 मार्च 2024 (08:31 IST)
Shivratri upay 2024 माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान शंकराचा आशीर्वाद मिळविण्यासाठी तुम्ही 5 निश्चित उपाय करून पहा.
 
1. फळे आणि पानांचे उपाय : महाशिवरात्रीला शिवलिंगावर बिल्वपत्र, शमीची पाने आणि धतुऱ्याची पाने अर्पण केली जातात. या दिवशी 21 बिल्वांच्या पानांवर चंदनाने 'ओम नमः शिवाय' लिहून शिवलिंगाला अर्पण करा. याने इच्छा पूर्ण होऊ शकतात. शमीच्या झाडाची पाने आणि चमेलीच्या फुलांनी भगवान शंकराची पूजा केल्याने अपार धन प्राप्त होते.
 
2. दिवा : महाशिवरात्रीला संध्याकाळी शिवमंदिरात दिवा लावल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात आणि धन-समृद्धी मिळते.
 
3. अन्नदान: शिवरात्रीच्या दिवशी गरीब आणि असहाय्य लोकांना अन्नदान करा. यामुळे घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासणार नाही आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल.
 
4. पिठाचे शिवलिंग : शिवरात्रीच्या दिवशी पिठापासून 11 शिवलिंगे बनवून त्यावर 11 वेळा जलाभिषेक करा. या उपायाने मूल होण्याची शक्यता असते.
 
5. बैल : शिवरात्रीला बैलाला हिरवा चारा खायला द्या. यामुळे जीवनात सुख-समृद्धी येईल आणि समस्या नाहीश्या होतील.
 
अस्वीकरण: येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. यासाठी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती