पाच वर्ष एकच मुख्यमंत्री हवा, आमचा फडणवीस यांना पूर्ण पाठींबा

गुरूवार, 31 ऑक्टोबर 2019 (16:25 IST)
राज्यात सध्या सत्ता स्थापनेचा विषय जोर धरून आहे. शिवसेना आणि भाजपा अजूनही कधी सत्ता स्थापन करणार आहे नक्की झाले नाही. मात्र आता प्रत्येक नेता त्याचे समर्थन त्या त्या पक्षाला आणि नेत्याला देत आहे. रामदास आठवले यांनी म्हटले की पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारा एकच मुख्यमंत्री हवा आहे. सोबतच भाजपाने जी विधीमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. 
 
या निवडणुकीत  महायुतीला लोकांचा जनादेश मिळाला असून, पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा एकच मुख्यमंत्री हवा ही आमची मागणी आहे असे आठवले म्हणाले तर  देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आमचाही पाठिंबा आहे असंही आठवले यांनी स्पष्ट केले आहे.  मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
शिवसेना आणि भाजपा यांच्यातला मुख्यमंत्रीपदाचा तिढा अजून तरी सुटताना दिसत नाही. अशात आता रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला आमचा पाठिंबा आहे असं रामदास आठवलेंनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेने समसमान वाटप या सूत्रानुसार अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे. मात्र रामदास आठवले यांनी भाजपाला पाठिंबा देत पाच वर्षांसाठी एकच मुख्यमंत्री हवा असं म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती