मनसेने याआधी दोन याद्या जाहीर केल्या. पहिल्या यादीत 27 जणांची नावं होती. तर दुसऱ्या यादीत 45 जणांचा समावेश होता. आता तिसऱ्या यादीत 32 जणांची नावं आहेत. आत्तापर्यंत मनसेने 104 उमेदवार दिले आहेत. मनसे 100 जागा लढवणार असा अंदाज व्यक्त होत होता. याशिवाय बाळा नांदगावकर यांचं नाव तिसऱ्या यादीतही देण्यात आलेलं नाही. त्यामुळे कदाचित ते यावेळी विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत असं बोलल जात आहे.