एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड

गुरूवार, 31 ऑक्टोबर 2019 (14:07 IST)
एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
 
शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठीची मुंबईत आज बैठक झाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.
 
त्यानंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं.
 
शिंदे हे सेनेत महत्त्वाचे आणि ताकदीचे नेते मानले जातात. त्यांच्याकडे मावळत्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खातं होतं.
 
याशिवाय सुनील प्रभु यांची विधानसभेतल्या प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे.
 
सुभाष देसाई हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांचेही नाव विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी चर्चेत होतं.
 
या बैठकीनंतर शिवसेनेचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत.
 
आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम आणि विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे दुपारी 3.30 वाजता ही भेट घेणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती