कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांच्या विरोधात कांदिवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरुपम यांच्यासह चारकोप विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस उमेदवार भारत पारिख यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणूक प्रचाराच्या काळात पैसे वाटप केल्याचा आरोप निरुपम यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. निरूपम यांचे कार्यकर्ते आणि मनसैनिकांमध्ये कांदीवलीत मारहाण झाल्याचेही वृत्त आहे.