विदर्भातील ६२ पैकी पाच मतदारसंघात मंगळवारी मतदान दोन तास लवकर संपेल. हे पाचही मतदारसंघ नक्षलवादी कारवायांच्या छायेतील असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
आमगाव, अर्जुनी मोरगाव ( दोन्ही गोंदिया जिल्हा), आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी (तिन्ही गडचिरोली जिल्हा) हे ते पाच मतदारसंघ आहेत. या पाचही मतदारसंघात मतदान सकाळी सातलाच सुरू होईल. मात्र ते दोन तास आधी म्हणजे दुपारी तीनलाच संपेल.
दरम्यान, पूर्ण विदर्भात मतदानासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांसोबत, राज्य व केंद्रातील राखीव पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया व भंडारा या तिन्ही जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे.