राज्‍यात मतदानाच्‍या दिवशी सुटी

राज्‍य विधानसभा निवडणुकीच्‍या मतदानानिमित्त दि.13 ऑक्टोबर रोजी सुटी जाहीर करण्‍यात आली आहे. मतदानाचे प्रमाण वाढावे आणि लोकांनी मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी हा निर्णय घेण्‍यात आला आहे.

राज्‍य सरकारने सर्व कार्यालयांना आणि दुकानदारांनाही मतदानाच्‍या दिवशी बंद ठेवण्‍याचे आवाहन केले आहे. तसेच ज्‍यकार्यालयाकडून या आदेशाचे पालन केले जाणार नाही त्यांच्‍या विरोधात कारवाईचाही इशारा देण्‍यात आला आहे.

गेल्‍या काही दिवसांपासून घटलेले मतदानाचे प्रमाण पाहता असा निर्णय घेण्‍यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा