राज्‍यभर दारूचा 'महापूर'

महाराष्‍ट्रातही आता उत्तर प्रदेश आणि बिहारमधील निवडणूक संस्‍कृती नांदू लागली असून आचारसंहितेच्या काळात राज्यात सुमारे 1 कोटी 84 लाख 82 हजारांची दारू पकडण्यात आली आहे. तर वेगवेगळ्या पक्षांच्‍या 3 हजार 680 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्‍या माहितीनुसार राज्‍यभरातील अनेक भागात मतदारांना दारू वाटण्‍याच्‍या घटना समोर आली असून त्‍यात सर्वांधिक दारू हिंगोली जिल्ह्यातील शेणगाव येथून जप्‍त करण्‍यात आली आहे. दारूचे 12 बॉक्स पकडले आहेत.

वेबदुनिया वर वाचा