आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे खेरवाडीतील विद्यमान आमदार जनार्दन चांदुरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदुरकर कथितरित्या मतदारांना पैसे वाटताना पकडले गेले.
या प्रकरणी प्राथमिक गुन्हा नोंदला गेला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. चांदुरकर यांच्याकडून पंधरा हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम आपल्या चालकाची असल्याचा त्यांचा दावा आहे.