दुष्काळग्रस्त भागातून वाळू उत्खननास बंदी

WD
राज्यात दुष्काळग्रस्त परिस्‍थितीची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने दुष्काळग्रस्त भागातून वाळूच्या उत्खननास मनाई केली आहे. न्यायालयाने यासंबधीचे निर्देश राज्य सरकारला जारी केले आहे.

दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या भागातून वाळूचा उपसा केल्यास नागरिक 'पाणी' या जीवनावश्यक गरजेपासून वंचीत होईल, म्हणून या भागात उत्खननास पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, असे मत न्यायमूर्ती मोहित शाह व अनूप मोहता यांच्या खंडपीठाने याचिकेवर सूनावणी करताना व्यक्त केले.

या भागात सद्याच पिण्यायोग्य पाण्याचा तुटवडा आहे आणि वाळूचा उपसा केल्यास परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची भीती आहे. (वृत्तसंस्था)

वेबदुनिया वर वाचा