८ वर्षीय राजूची दुष्काळग्रस्तांसाठी 'बर्थडे'स दांडी

WD
राज्यात दुष्काळाने उग्र स्वरूप धारण केल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील एका ८ वर्षाच्या चीमुकल्याने वाढदिवस साजरा न करता वाचणारी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस देऊन अनोखे उदाहरण घालून दिले आहे.

कनिष्क राजु डोंगरे नावाचा दुसर्‍या वर्गात शिकणार्‍या या विद्यार्थ्याने आपल्या वाढदिवशी मंत्रालयात जाऊन थेट मुख्यमंत्र्यांचे कार्यालय गाठले आणि बर्थडे पार्टीचे वाचवलेले ५ हजार रूपये मुख्यमंत्र्यांच्या सुपूर्द केले. यावेळी त्याचे आई-वडिलही उपस्थित होते.

राजुचे वडिल फोटोग्राफर असून त्याने मिळणार्‍या पॉकेटमनीमधून वाढदिवसासाठी हा निधी गोळा केला होता. मुख्यमंत्र्यांनी यासाठी राजुचे अभिनंदन केले यातून राज्याच्या समस्यांप्रती मुलांची जागरूकता सिद्ध होत असल्याचे सांगून समाजापुढे उदाहरण घालून देणारी कृती असल्याचे ते म्हणाले. (भाषा)

वेबदुनिया वर वाचा