महाराष्ट्रात 3 एप्रिलपासून होणार्या आठ आयपीएल क्रिकेट सामन्यांचे उत्पन्न राज्यातील दुष्काळ निवारण्यासाठी द्यावे, अशी मागणी शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
शिवसेना भवनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्रात दुष्काळाचा वणवा पेटला आहे. मराठवाडा, खान्देश व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील जनता पाणी टंचाई व चारा टंचाईने होरपळत आहेत. केंद्र सरकारने टंचाई निवारण्यासाठी राज्याला खूप कमी निधी दिला आहे. त्यामुळे आयपीएल सान्यातून मिळणारे 500 कोटी रुपये दुष्काळ निवारण्यासाठी द्यावेत.