श्रीक्षेत्र माहूर गड

शनिवार, 12 जून 2021 (22:39 IST)
नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माहूर वसले आहे.माहूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे. ते नांदेड शहरापासून 130 किलोमीटर अंतरावर आहे.
 
हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असून येथील पीठाची देवता रेणुकादेवी आहे. रेणुकादेवी तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांचीदेखील प्राचीन मंदिरे माहूरगडावर आहेत. येथे मंदिरासमोरच एक किल्ला आहे. या किल्ल्यामध्ये अनेक वन्यजीव आढळून येतात.
 
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता आहे .श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.देवीचे मंदिर 13 व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते.
 
माहूर ला बघण्यासारखे म्हणजे रामगड म्हणजे माहूर किल्ला, माहूर संग्रहालय, सोनापीर दर्गा, पांडवलेणी,राजे उद्धवराव उर्फ उदाराम देशमुखांचा वाडा असे काही ऐतिहासिक वास्तू माहूरमध्ये बघण्यासारखे आहे.श्रीरेणुकादेवीमंदिर, अनुसयामाता मंदिर, देवदेवेश्वर मंदिर इ. धार्मिकस्थळे माहूरला आहेत.गावात एक छोटेखानी पुराणवस्तुसंग्रहालय आहे. त्यात कलाकुसरीच्या अनेक वस्तू व पुरातन शिल्पे ठेवली आहेत. त्यातील अंगठ्याएवढी बालाजीची मूर्ती बघण्यासारखी आहे.
 
कसे जायचे -
* नांदेड पर्यंत लोहमार्गाने मध्य रेल्वेवर येते. मुंबई, पुणे, हेदराबाद, औरंगाबाद, तसेच बंगळूर येथून नांदेड ला रेल्वे ने थेट जाऊ शकतो.
 
* माहूर पर्यंत- नांदेड ते माहूर एसटीची बस सेवा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ चालते.हा सुमारे तीन तासाचा प्रवास आहे.
 
* माहूर गावापासून टेकडी मंदिर-शहरातून टेकडी पर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या तसेच काही खासगी सेवा  देखील मिळतात.
 
* नागपूर ते माहूर -(वर्धा-यवतमाळ-मार्गे) रस्त्याने सुमारे 220 किलोमीटर आहे. या प्रवासासाठी राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या व काही अत्यल्प खाजगी वाहनेही मिळतात.
 
माहूरला राहण्याची उत्तम सोय आहे येथे राहण्यासाठी भक्तवात्सल्या आश्रम आहेत.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती