Maharashtra Tourism : २२ जानेवारी २०२६ रोजी म्हणजेच आज माघी गणेश जयंती आहे. पुण्याला 'गणेशाची नगरी' मानले जाते, त्यामुळे या दिवशी पुण्यातील मंदिरांमध्ये मोठी गर्दी आणि उत्सवाचे वातावरण असते. यानिमित्त आज आपण पुण्यातील काही अत्यंत प्रसिद्ध आणि जागृत गणपती मंदिरे पाहणार आहोत जिथे तुम्ही नक्कीच भेट देऊन बाप्पाचे आशीर्वाद घेऊ शकतात.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे केवळ पुण्याचेच नाही तर जगातील सर्वात प्रसिद्ध गणपती मंदिरांपैकी एक आहे. येथील गणपतीची मूर्ती अत्यंत देखणी असून ती सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेली असते. माघी गणेश जयंतीला येथे विशेष फुलांची सजावट आणि उत्सव असतो.
सारसबाग गणपती
पुण्यातील सारसबाग गणपती हे मंदिर एका सुंदर बागेत आणि तळ्याच्या मध्यभागी आहे. पेशव्यांच्या काळात या मंदिराची निर्मिती झाली होती. येथील गणपतीच्या मूर्तीची सोंड उजव्या बाजूला आहे, ज्याला 'सिद्धिविनायक' म्हटले जाते.