निवडक अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानांची सैर..

WD

भारता सरकारने आजही काही ठिकाणंही खास घोषित केल्यामूळे अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानांच्या मार्फत आपण वन्यजीवांना याचि देहि याची डोळा पाहू शकतो.. खास वन्यप्रेमींना आकृष्ट करणारी काही ठिकाणं.

नागझिरा :


गोंदिया जिल्ह्यातील साकोली तालुक्यात हे अरण्य वसले आहे. १९६९ मध्ये मारूती चितमपल्ली यांच्यामुळे या अभयारण्याची निर्मिती झाली. १५३ चौरस किमी परिसरात वसलेल्या या अभयारण्यात प्राचीन काळी हत्तींचे वास्तव्य असल्याने याला नागझिरा असे नाव पडले. तळ्याभोवती वसलेल्या या जंगलात वनविश्राम गृह आहे. खास विद्यार्थ्यांसाठी टू टायर बेडस् असलेले युथ हॉस्टेलसुद्धा आहे. या जंगलात आढळणारा मुख्य वृक्ष म्हणजे साग. त्याचबरोबर धावडा, तीवस, एैना, जांभूळ, बिजा इत्यादी वृक्ष आढळतात. तळ्याच्या काठावर आणि टेकडीवर, तसेच जंगलामध्ये अनेक ठिकाणी वनखात्याने निरीक्षण मनोरे तयार केले आहेत. वाघ, बिबटे, रानकुत्री, अस्वले, नीलगाय, चितळ, सांबर, भेकर, कोल्हे असे विविध प्राणी आणि धनेरा, सर्पगरूड, सातभाई, स्वर्गीय नर्तक, वेडा राघू असे पक्षीही आढळतात.

पुढील पानावर पाहा ताडोबा राष्ट्रीय उद्यान


WD

ताडोबा राष्ट्रीय उद्यान


नागपूरपासून १५० कि.मी.वर चंद्रपूर आहे. याच जिल्ह्यात हे उद्यान येते. चंद्रपूरपासून येथे जाण्याकरता ४५ कि.मी. प्रवास करावा लागतो. उष्णकटीबंधीय शुष्क पानझडीचे जंगल या प्रकारात हे जंगल मोडते. यात मोह, बेगडा, अमलतारा, तेंद, बांबू, हिरडा इ. वृक्ष आहेत. अनेक सरपटणारे प्राणी, सरडे, विविध फुलपाखरे तसेच जलाशयातील मगर हे इथले खास आकर्षण आहे. इथल्या तळ्याकाठी निवासस्थाने असून, रात्री किंवा सकाळी तळ्याच्या काठावर बसून अनेक प्राणी-पक्षी न्याहाळता येतात.

पुढील पानावर पाहा पेंच राष्ट्रीय उद्यान


WD

पेंच राष्ट्रीय उद्या


नागपूरपासून ६५ कि.मी. अंतरावर जबलपूर रस्त्यावर पेंच नदीच्या तीरावर हे उद्यान वसले आहे. साग, शिसवी, ऐन, तीवस, मोह, खर ही प्रमुख झाडे येथे पाहायला मिळतील. जवळपास २०० जातींचे पक्षी या उद्यानात आढळतात. नागपूर जिल्ह्यातील गोलिया पहाड हे उंच शिखर उद्यानाच्या पूर्व भागात आहे. सिलारी, तोतलाडोह, राणीडोह इथे विश्रामगृह उपलब्ध आहेत.

पुढील पानावर पाहा मेळघाट


WD

मेळघा


अमरावती जिल्ह्यातील सातपुडय़ाच्या दक्षिणेकडील रांगांच्या परिसरात मेळघाटात सर्वाच्या परिचयाचा व्याघ्र प्रकल्प वसलेला आहे. मेळघाटातून सिपना, खंडू, खापरा, डोलारा आणि गंडगा या पाच नद्या वाहतात. चोहोबाजूंनी आलेल्या घाटांचा मेळ असा हा मेळघाटचा अर्थ होतो. १५९७ चौ.कि.मी इतके क्षेत्र या प्रकल्पात मोडते. साग विपुल असणाऱ्या या जंगलात घाणेरीच्या घनदाट जाळ्या आणि बांबूंची बेटंही विराजमान आहेत. राहण्याची सोय असून, जंगलातून रात्री फेरफटका मारण्यासाठी मिनी बस आहेत. भेकर, सांब, गवे येथे विपूल प्रमाणात आढळतात.

पुढील पानावर पाहा राधानगरी-दाजीपूर


WD

राधानगरी-दाजीपूर


सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर म्हणजेच कोल्हापूर-फोंडा रस्त्यावर ४८ कि.मी. अंतरावर हे अरण्य वसले आहे. येथे पिसा, जांभूळ, आंबा, हिरडा असे वृक्ष आढळतात. त्याचबरोबर रानकोंबडय़ा, बिबटे, खवली मांजरे, रानडुकरं येथे आढळतात. येथे राहण्याची उत्तम सोय आहे. त्यामुळे किमान तीन दिवस तरी येथे भेट द्यायला हरकत नाही.

याव्यतिरिक्त नवे गाव बांधा, रेहेकुरी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यन, भीमाशंकर, कर्नाळा अभयारण्य, तानसा, किनवट, सागरेश्वर अशी अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रात वसलेली आहेत.

वेबदुनिया वर वाचा