कासचं पठार

PR
सातारा जिल्ह्यात सध्या एका ठिकाणाचे नाव खूप गाजत आहे. ते म्हणजे कासचं पठार. कासचं पठार म्हणजे महाराष्ट्रातील व्हॅली ऑफ फ्लोवर्स आहे. साधारण सप्टेंबर महिन्यात या पठारावर असंख्य विविधरंगी फुले फुलतात आणि त्याचा आनंद घेण्यासाठी पाहण्यासाठी हजारो लोक तेथे भेट देतात.

कासबरोबरच सातार्‍याजवळ ‍नदीकिनारी आणि जुन्या मंदिरांचा समूह असणार्‍या माहुली या ठिकाणी नक्की भेट दिली पाहिजे. त्याचप्रमाणे अजिंक्यतारा, सज्जनगड समूह देखील मस्तच आणि येथून जवळ असलेल्या ठोसेघर धबधब्याची सुंदरता म्हणजे अप्रतिमच होय, साताराहून 8 किलोमीटर असणार्‍या कण्हेर धरणालासुद्धा भेट देता येईल.

वेबदुनिया वर वाचा