राज्यात 1 एप्रिलपासून CNG स्वस्त, 1 एप्रिलपासून नवे दर लागू

शनिवार, 26 मार्च 2022 (14:56 IST)
महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून सीएनजी स्वस्त होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थसंकल्पातील घोषणेनंतर सीएनजीवरील व्हॅट कपातीची वित्त विभागाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
 
यामुळे सीएनजीवरील व्हॅट 13.5 ऐवजी आता 3 टक्के झाल्याने राज्यात CNG इंधन स्वस्त होणार आहे. अर्थसंकल्पातील घोषणेची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून केली जाणार आहे.
 
इंधनवाढीच्या दरवाढीच्या पाश्वभूमीवर सीएनजीचे दर कमी होणार असल्यामुळे सीएनजीवरील वाहन चालवणाऱ्या दिलासा मिळणार आहे.
 
उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना शुक्रवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जारी करण्यात आली. सीएनजीचे कमी झालेले नवे दर ता. 1 एप्रिल 2022 पासून लागू होतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती