अजित पवारांच्या अडचणी वाढल्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. 29 ऑक्टोबर रोजी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला होता.यानंतर शनिवारी राष्ट्रवादीच्या नेत्याने विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली.
जनतेने मला येथून निवडणूक लढवण्याची विनंती केली आहे. मानखुर्द शिवाजी नगरमधील गुंडगिरी आणि अमली पदार्थांच्या व्यापारामुळे जनता प्रचंड नाराज आहे. जनतेला बदल हवा आहे. मी मानखुर्द शिवाजी नगरमधून निवडणूक लढवणार आणि नक्कीच जिंकेन. मला कोणाचा विरोध आहे याची मला पर्वा नाही. जनता मला साथ देत असून मी निवडणूक लढवणार आहे. असे ते म्हणाले.