काँग्रेसने उद्धव ठाकरेंची मागणी फेटाळून लावली, केले शरद पवारांच्या वक्तव्याचे समर्थन

बुधवार, 4 सप्टेंबर 2024 (19:14 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला आहे.जागावाटपाला घेऊन बैठका होत आहे. महाविकास आघाडी ने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर अद्याप केला नाही. उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली होती. तसेच अधिक आमदार असलेल्या पक्षाला मुख्यमंत्री करू नये अशी मागणी केली होती. 

त्यांच्या मागणीला शरद पवारांनी फेटाळून लावले असून संख्यात्मक बळावर मुख्यमंत्री निवडला जाईल. असे म्हणाले, त्यावर आता काँग्रेस ने देखील उद्धव ठाकरे यांची मागणी फेटाळून लावली असून महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात बोलताना सांगितले की , शरद पवार जे काही बोलले ते बरोबर बोलले. आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीत उतरणार आहोत. माविआ ही आमचे संख्यात्मक असेल. मुख्यमंत्र्यांचा निर्णय आम्ही निवडणुका नंतर घेऊ.ते शरद पवारांच्या वक्तव्याचे समर्थन देत असल्याचे म्हणाले. 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती