अजित पवारांनी जन सन्मान यात्रेची घोषणा केली, मतदार संघात जनतेशी संवाद साधणार

मंगळवार, 6 ऑगस्ट 2024 (09:16 IST)
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्व पक्ष लागले आहे. उप मुख्यमंत्री अजित पवार देखील निवडणुकीच्या तयारीला लागले असून स्वबळावर त्यांनी तयारी सुरु केली आहे. पक्षाच्या प्रचारासाठी त्यांनी जन सन्मान यात्रेची घोषणा केली आहे. अजित पवारांनी महिला, तरुण, शेतकरी आणि अल्पसंख्यकांना लाभ देणाऱ्या अनेक योजनांचा प्रचार करण्यासाठी जन सन्मान यात्रेची घोषणा केली आहे.

अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, पक्षाच्या यात्रेचा पहिला टप्पा 8 ऑगस्ट पासून नाशिक मधून सुरु होणार आणि 31 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. सन्मान यात्रा पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा भागातून 22 ऑगस्ट रोजी मुंबईत पोहोचणार.

या यात्रेच्या माध्यमातून अजित पवार सर्व मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा आणि बैठक घेणार तसेच जनतेशी संवाद साधणार आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला 15 ऑगस्ट पर्यंत निश्चित होण्याची शक्यता आहे.फॉर्मुल्या अंतर्गत ज्या जागेवर पक्षांचे आमदार विजयी झाले आहे त्या जागांसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे उमेदवार जिंकून आले आहे त्या पक्षाचेच उमेदवार त्या जागेवरून निवडणूक लढवणार आहे. असे अजित पवार म्हणाले.  
Edited by - Priya Dixit   
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती