हरिद्वार कुंभ मेळा 2021 हरिद्वाराच्या घाटाचे 10 गुपिते जाणून घ्या

शनिवार, 23 जानेवारी 2021 (18:15 IST)
अनिरुद्ध जोशी 
उत्तरांचल प्रदेशातील हरिद्वार म्हणजे श्रीहरी भगवान विष्णूंचे दार. हरिद्वार ला भगवान श्रीहरी(बद्रीनाथ)चे दार मानले जाते,जे गंगेच्या काठावर आहे. ह्याला गंगादार आणि पुराणामध्ये मायापुरी क्षेत्र म्हटले जाते. हे भारतातील सात पवित्र स्थानांपैकी एक आहे. हरिद्वारात हर की पौडी च्या घाटावर कुंभ मेळावा भरतो. चला या हर की पौडी बद्दल जाणून घेऊ या. 
 
1 हर की पौडी  ते घाट आहे जे विक्रमादित्य ने आपल्या भावाच्या भर्तृहरी च्या स्मरणार्थ बनविले.
 
2 या घाटाला ब्रह्मकुंडच्या नावाने देखील ओळखतात .जे गंगेच्या पश्चिम तटी आहे.
 
3 आख्यायिकेनुसार  हर की पौंडी मध्ये स्नान केल्यानं जन्मोजन्मीचे सर्व पाप नाहीसे होतात. 
 
4 हर ची पौडी म्हणजे हरीची पौडी. येथे एका दगडात श्री हरी विष्णू ह्यांचे पाउले उमटले आहे म्हणून ह्याला हरीची पौडी म्हणतात.
 
5 इथून गंगा पर्वतांना सोडून उत्तर दिशेला मैदानी क्षेत्राकडे वळते.
 
6  हर ची पौडी या जागेवर समुद्र मंथनाच्यावेळी अमृताच्या घटामधून अमृत पडले होते. 
 
7 असे ही म्हटले जाते की हेच ते तीर्थ क्षेत्र आहे जेथे वैदिक काळात श्री हरी विष्णू आणि भगवान शिव प्रकटले होते.
 
8 येथे ब्रह्माजींनी प्रसिद्ध यज्ञ केला होता.
 
9 इथे दररोज प्रख्यात गंगेची आरती  होते ज्याला बघण्यासाठी देश परदेशातून पर्यटक भेट देतात. त्या वेळी इथले दृश्य बघण्यासारखे असते. 
 
10 इथे दररोज संध्याकाळी लहान भारताचे दर्शन घडतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती