जीवन आणि जगण्याचे तत्त्वज्ञान यांचे समीकरण दर्शवणारा हा सिनेमा मिहीर शाह यांची ही पहिलीच मराठी निर्मिती आहे. दत्ता मोहन भंडारे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दिग्दर्शनासोबतच कथा, पटकथा आणि संवाद लेखनाची जबाबदारीही भंडारे यांनी सांभाळली आहे. संदीप कुलकर्णी, सुयोग गोहे, विद्या करंजीकर, सायली पाटील या कलाकारांनी सजलेला चित्रपट नक्कीच काही न काही संदेश देईल असे ट्रेलर बघून जाणवतंय.