हिंदीमध्ये 17 सिनेमांची निर्मिती करणारे दिग्दर्शक गुड्डू धनोआ आता मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. बारबाला आणि पोलिसांचा संघर्ष दाखवणारा 'गुलाबी'च्या माध्यमातून धनोला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. धनोआ यांनी हिंदीमध्ये शाहरुख खानपासून सनी देओल, अक्षय कुमार, सैफ अली खान यांनासोबत घेऊन अनेक यसश्वी सिनेमे दिले आहेत. येत्या 12 सप्टेंबरला धनोआ यांचा 'गुलाबी' हा मराठी सिनेमा लॉन्च होत आहे. जय महाराष्ट्र बॅनरखाली तयार झालेल्या सिनेमात सचिन खेळेकर आणि पाखी हेडगे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.