सपा, राजद, लोजपाचा मनमोहन यांना पाठिंबा

समाजवादी पक्षाने पंतप्रधानपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिलेला पाठिंबा आज 'काढून' घेतला आणि लालूप्रसाद यादव व रामविलास पासवान यांच्या सुरात सूर मिसळत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील असे जाहीर केले.

मुलायम, लालूप्रसाद व रामविलास पासवान या तिघांनीही आज संयुक्त पत्रकार परिषद घेत डाव्यांवर जोरदार टीका केली. डावे आपल्या विचारसरणीपासून दूर गेले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर आपली अपार श्रद्धा असून कॉंग्रेसच्या 'मॅनेजरांनी' पक्षाची उत्तर प्रदेश व बिहारमध्ये आघाडी होऊ दिली नाही, असे सांगून लालूप्रसाद यांनी, संपुआ म्हणजे केवळ कॉंग्रेस नव्हे. सरकार बनविण्यात राजद व लोजपाचीही महत्त्वाची भूमिका होती. शिवाय सपानेही अणू करारावरून सरकारला पाठिंबा दिला होता, याकडे लक्ष वेधले.

वेबदुनिया वर वाचा