लोकशाहीच्या कुंभमेळ्यात तृतीयपंथीयही

लोकसभा निवडणुकीच्या कुंभमेळ्यात हवशे, नवशे, गवशे आणि तृतीयपंथीयही सामील झाले आहेत. मध्य प्रदेशातील खांडवा लोकसभा मतदारसंघातून नर्गिस मौसी या तृतीयपंथीयाने उमेदवारी अर्ज भरला आहे.

१९९८ मध्ये शबनम मौसी या तृतीयपंथीने राज्यातील शहाडोल जिल्ह्यातील सोहागपूरमधून निवडणूक जिंकून आमदारकी मिळवली होती. त्यानंतर त्यावर शबनम मौसी नावाचा चित्रपटही झाला.

नर्गिस मौसीने भ्रष्टाचार दूर करण्यासाठी आपण निवडणुकीत उतरल्याचे सांगितले.

वेबदुनिया वर वाचा