केंद्रीय विमान वाहतूक उड्डयण मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या समवेत राज्यात होत असलेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी 396 उमेदवारांनी विदर्भ, मराठवाडा, आणि महाराष्ट्राच्या काही भागातून आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले.
13 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकांमध्ये भाजप, कॉग्रेसच्या उमेदवारांसह जवळपास 254 उमेदवारांनी आज एका दिवसात आपला अर्ज दाखल केला.
विदर्भातील 10 जागांसाठी 203 उमेदवारांनी तर मराठवाड्यातील 51 जणांनी तीन जागांसाठी अर्ज दाखल केला.