रावेरची उमेदवारी रवींद्र पाटलांना

पुनर्रचनेनंतर नव्‍याने निर्माण झालेल्‍या रावेर मतदार संघाची उमेदवारी राष्‍ट्रवादीच्‍या ताब्यात आली असून याजागी पक्षातर्फे जळगाव जिल्‍हाध्‍यक्ष रवींद्र प्रल्‍हादराव पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

या मतदार संघातून उमेदवारी कुणाकडे जात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. पक्षाने आज ती उत्सुकता शांत करताना पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ही जागा कॉंग्रेससाठी सोडावी अशी आग्रही भूमिका कॉंग्रेसने घेतली होती.

या मतदार संघात शिवसेना-भाजपने विद्यमान खासदार हरीभाऊ जावळे यांनाच उमेदवारी दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा