राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा नसून तो श्रद्धेचा विषय असल्याची मखलाशी भाजपचे उपाध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी केली आहे.
केंद्रात भाजपचे सरकार आल्यास जम्मू काश्मीरमधून ३७० कलम काढण्यात येईल याचाही त्यांनी पुनरूच्चार केला. वरूण गांधी तुरूंगात राहिले तरीही निवडणूक लढतीलच असे सांगून केंद्र व राज्य सरकारने वरूणवर केलेली कारवाई अनुचित असल्याचेही ते म्हणाले.