काही पक्ष जातीवर, काही पक्ष नेत्यांवर तर कॉग्रेस पक्ष कुटुंबावर आधारीत असून, भारतीय जनता पार्टी ही जनतेवर आधारित असल्याचे सांगत गोपीनाथ मुंडे यांच्याकडे दुर्लक्ष केले जाणार नसल्याचे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी स्पष्ट केले आहे.
अडवाणी यांची औरंगाबादमध्ये सभा झाली यानंतर त्यांनी पत्रकारपरिषदेत दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची आठवण काढत त्यांना विसरणे अशक्य असल्याचे अडवाणी म्हणाले.
भाजपमध्ये कोणताही नेता नाराज नाही. गोपीनाथ मुंडे तर मुळीच नाहीत. पक्षाचे मुंडेंकडे दुर्लक्ष नसल्याचे सांगत पुनम यांना पक्षात योग्य स्थान देण्याचे संकेतही त्यांनी दिला.