राजकारण करण्यासाठी मला कुणाच्याही सल्ल्याची गरज नाही. काय करावे आणि केव्हा करावे ते मला चांगले कळते. मी कुणाच्याही दबावात काम करीत नाही, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शदर पवार यांनी घेतली आहे.
तिस-या आघाडीच्या रॅलीसाठी भुवनेश्वरला जाण्याच्या पवार यांच्या प्रयत्नानंतर त्यांच्यावर कॉंग्रेसने जोरदार टीका केली होती. त्यानंतर त्यावर प्रहार करताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रमुख आणि केंद्रीय कृषिमंत्री पवार म्हणाले, की मला कुणाच्या सल्ल्याची गरज वाटत नाही.
भुवनेश्वरमध्ये झालेली बैठक बीजू जनता दलाने आयोजित केली होती. त्यांच्यासोबत आम्ही ओरीसात आघाडी केली आहे. त्यामुळे मी तेथे जाण्यात काहीही वाईट नव्हते.