पुण्यातील सभेत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार व राहुल गांधीवर टीकास्त्र सोडले

सोमवार, 29 एप्रिल 2024 (21:36 IST)
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात महासंकल्प विजयी सभा सुरु आहे. या सभेतूनच पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी आणि शरद पवारांवर जोरदार टीकास्त्र केले. 
पुण्यातील चार जिल्ह्यातील मतदारसंघात महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची पुण्यातील रेसकोर्स मैदानावर महासंकल्प विजयी सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महायुतीचे पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते, अधिकृत उमेदवार पदाधिकारी, महिला आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 
 
सभेतून पंतप्रधानांनी राहुल गांधी आणि शरद पवारांवर तोफ डागली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकारण एका नेत्यामुळे अस्थिर झाले आहे. राज्यातील एका अनुभवी नेत्याने हा खेळ 45 वर्षांपूर्वी सुरु केला. या मुळे अनेक मुख्यमंत्र्यांची पदे अस्थिर झाली. इथे काही भटके आत्मे आहे. या भटक्या आत्म्याने केवळ विरोधकांचे नवे ते स्वतःच्या पक्षाला अस्थिर केलं आहे. या भटक्या आत्म्याने 1995 च्या आघाडी सरकारलाही अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. यांनी 2019 मध्ये जनादेशाचा अपमान केला असं म्हणत मोदींनी शरद पवारांचे नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडलं.
 
Edited By- Priya Dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती