सध्या लोकसभाच्या निवडणुकांची तयारीत सर्व पक्ष व्यस्त आहे. भाजपला लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा विजय होणार असा विश्वास आहे. सध्या सरकारी अधिकारी नव्या सरकारसाठी नवीन कृती योजना बनवण्यात व्यस्त झाले आहे. पंतप्रधान मोदींनी तिसऱ्यांदा कारभार सांभाळला तर आता एकूण 54 मंत्रालय आहेत तर मंत्रालयाची संख्या कमी होईल तसेच परिवहन क्षेत्रातील मंत्रालयांचे विलीनीकरण होण्याची शक्यता आहे.
मोदींच्या प्लॅन 3 अनुसार, वृद्धांची पेन्शन वाढणार असल्याचे वृत्त आहे. या महिन्यात कॅबिनेट सचिवांनी बोलावलेल्या बैठकीत झालेल्या चर्चानुसार, वृद्धांची पेन्शन 2030 पर्यंत वाढणार आहे.