निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

शुक्रवार, 17 मे 2024 (09:38 IST)
नाशिकच्या पंचवटी येथे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी केली. शिंदे एका सभेला संबोधित करणार होते. 
त्यांचे हेलिकॉप्टर थांबवून शिंदे यांच्या सामानाची झडती घेण्यात आली. मात्र कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही. 

शिवसेनेचे उबाठा चे खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांनी रोख भरलेला बॅग हेलिकॉप्टर मधून नाशिकला नेल्याचा आरोप केला होता. शिंदे यांच्या शिवसेनेने हा दावा फेटाळून लावला. राऊत यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केले आहे. या मध्ये शिंदे हेलिकॉप्टर मधून मोठ्या बॅगा घेऊन खाली उतरण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

मुख्यमंत्री शिंदे हे सध्या नाशिक दौऱ्यावर असून महायुतीचे नाशिक मतदार संघाचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचार करण्यासाठी रोड शो करणार आहे. नाशिक मध्ये त्यांचे हेलिकॉप्टर येतातच निवडणूक अधिकारी तिथे पोहोचले आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन बॅगांची तपासणी केली.तपासणीत त्यांच्या बॅगांमध्ये काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. 

संजय राऊतांनी मुख्यमंत्रीवर आरोप करत बॅगेत पैसे नेण्याचा आरोप त्यांनी केला. प्रसारमाध्यमांशी संवाद करताना राऊत म्हणाले, त्यांना जनतेचा पाठिंबा असल्यावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशांची गरज काय? आमचे हेलिकॉप्टर तपासण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळ आहे पण या लोकांवर कारवाई केली जात नाही. असा आरोप केला होता.  
 
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी 20 मे रोजी महाराष्ट्रातील 13 जागांवर मतदान होणार आहे, ज्यामध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अभिनेता-राजकारणी भूषण पाटील आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम हे प्रमुख उमेदवार आहेत.

Edited by - Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती