UN ने केले सावध, कोरोनाच्या काळात वाढू शकतात सायबर गुन्हे

सोमवार, 25 मे 2020 (18:27 IST)
कोरोना विषाणूंच्या काळात सायबर गुन्हेगारी वाढत आहे आणि दुर्भावनापूर्ण ईमेल मध्ये 600 टक्क्यांनी वाढ झाली आहे, संयुक्त राष्ट्राने याबाबद सावध केले आहे. 
 
इझुमी नाकामित्सु यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अनौपचारिक बैठकीत सांगितले की कोरोना विषाणूंचे संकट जगाला अजून नावीन्यपूर्ण नवे तांत्रिकी आणि ऑनलाईन सहकार्याकडे नेत आहे. 
 
ते म्हणाले की जगभरातील आरोग्य संस्था आणि वैद्यकीय संशोधन केंद्रांवर (सायबर) हल्ल्याच्या चिंताजनक बातम्या येतं आहे. नाकामित्सुने म्हटले की डिजीटल अवलंबणं वाढल्याने सायबर हल्ल्याची शक्यता वाढली असून असे हल्ले दर 39 सेकंदाला होत असल्याचे सांगितले जात आहे. 
 
आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघानुसार अजूनही तब्बल 90 देश सायबर सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. नाकामित्सुने म्हटले आहे की सूचना आणि संचार तंत्रज्ञानाचा दुरुपयोग होण्याचा धोका वाढला आहे. 
 
त्यांनी या धोक्याला सामोरा जाण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची काही जागतिक प्रगतींकडे इशारा देत म्हटले की काही चांगल्या बातम्या देखील आहेत. अश्या प्रकाराच्या संकटाला सामोरा जाण्यासाठी सरकारी तज्ज्ञांच्या गटाने या प्रकाराच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी जवाबदार वर्तनाचे 11 स्वैच्छिक गैर-बाध्यकारी नियम तयार केले आहे.
 
एस्तोनियाचे पंतप्रधान जायरी रातास यांनी म्हटले आहे की सुरक्षित आणि कार्यशील सायबर स्पेसची गरज अधिक आहे. एस्तोनिया यांच्याकडे सध्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद असून त्यांनी याविषयी बैठक घेतली. 
 
त्यांनी विशेष करून कोरोना विषाणू महामारीच्या काळात रुग्णालय, वैद्यकीय संशोधन केंद्र आणि इतर संस्थांना लक्षित करून केल्या जाणाऱ्या सायबर हल्ल्यांचा निषेध केला आहे. रातास म्हणाले की असे हल्ले अस्वीकृत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती