अनेक नावंत इलेक्ट्रॉनिक कंपन्या या देशात असून त्यांनी जगात त्याचा दबदबा निर्माण केला आहे. या देशात खूपच मजेशीर वाटतील अशा अनेक परंपरा आहेत आणि आधुनिक काळातही त्या पाळल्या जातात. येथे माणसाच्या रक्तगटाचा संबंध त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी जोडला जातो आणि त्यामुळे मैत्री, जोड्या जमविताना कुठल्या रक्तगटाशी आपले जुळू शकेल याचा विचार केला जातो. येथील नागरिकांना प्लॅस्टिक सर्जरीचे वेड आहे. देशातील 1/3 महिला कोणत्या ना कोणत्या प्रकारची कॉस्मेटिक सर्जरी किमान एकदा तरी करतात. या उलट येथील पुरुष वर्ग मेकअपचा चाहता आहे. मित्रांसोबत हँगआउट अथवा गेट टुगेदर करण्यासाठी कोणत्याही सोयीच्या जागी असलेल्या स्त्रीत कॉर्नरलापसंती दिली जाते. येथील डेटवर असलेली तसेच विवाहित जोडपी एकसारखा पोशाख करण्यास प्राधान्य देतात. येथे दुकानात जोडप्यांना वापरता येथील असे पेअर्ड शूज, ड्रेस ळितात. नर्सरीतील मुलांना ठरावीक रंगाचा गणवेश दिला जातो. प्रेग्रंट महिलांना सरकार 500 डॉलर्स हे स्पेशल क्रेडीट कार्ड देते, त्यांच्यासाठी पार्किंगला खास जागा असते आणि सबवेमध्ये गुलाबी रंगाच्या सीट राखलेल्या असतात. येथील तमाम जनता पॉवर नॅप घेण्यात तरबेज आहे. येथील बहुतेक सर्वांना झोपेचे वरदान आहे. कर्मचारी वर्ग, विद्यार्थी चटकन कुठेही डुलकी घेतात आणि फ्रेश होतात. येथील सरासरी झोप घेण्याचे प्राण 4 ते 5 तास इतकेच आहे.