मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड बंद होणार

सोमवार, 24 सप्टेंबर 2018 (09:10 IST)
देशात सध्या फक्त 2 प्रकारचे कार्ड उपलब्ध आहेत. यात मॅग्नेटिक स्ट्राईप आणि दूसरं चिप असणारं कार्ड. पण आता बँक मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड बंद होणार आहेत. चिप असणारे कार्ड त्याला रिप्‍लेस करणार आहेत. आरबीआयच्या आदेशानंतर बँकांना ग्राहकांना कार्ड रिप्लेस करुन देणं अनिवार्य असणार आहे.  कार्ड बदलण्यासाठी डिसेंबरपर्यंत मुदत असणार आहे. ग्राहकांचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड यामुळे आणखी सुरक्षित होणार आहे.
 
रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2016 मध्ये सगळ्या बँकांना आदेश दिले होते की, ग्राहकांना सामान्य मॅग्‍नेटिक स्‍ट्राईप कार्डच्या ऐवजी चिपचे कार्ड दिले जावे. डिसेंबर 2018 पर्यंत यासाठी मुदत देण्यात आली आहे.  ग्राहकांना यासाठी सूचना देखील देण्यात आले आहेत. देशात सध्या 39.4 मिलियन अॅक्टिव क्रेडिट कार्ड आणि 944 मिलियन अॅक्टिव डेबिट कार्ड वापरले जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती